Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना घडामोडी व महान स्वातंत्र्य सेनानींच्या दूर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना घडामोडी व महान स्वातंत्र्य सेनानींच्या दूर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

अंबाजोगाई, दि. १५: मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातीत दूर्मिळ अशा छाया चित्रांचे प्रदर्शन, जिल्हा परिषद हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे दिनांक १७ व १८ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले असून हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वासाठी मोफत खूले राहणार आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो व राज्य शासनाचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तसहसील कार्यालय, पंचायत समिती व वृक्षमित्र अभियान अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या प्रदर्शनात  मराठवाडा मुक्तिसंग्राम व  भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्वाच्या घटना-घडामोडी, दूर्मिळ अशा चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात १८५७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात माडण्यात आली आहे.

या वेळी दोन दिवसांकरिता देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार असून भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा मुळ उद्देश हा विद्यार्थी आणि नविन पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्या सेनानिंच्या अथक परिश्रमाची व बलिदानाची आठवण व्हावी हा आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून यावेळी अपर जिल्हाधिकारी शरद झाडके, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, तहसिलदार विलास पाटील, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे-काळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, गट शिक्षणाधिकारी व्ही.आर. शेख, गटशिक्षणाधिकारी(परळी)श्रीराम कनाके, तालूका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, विविध शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनास सर्वांनी भेटी द्याव्यात, असे आवाहन केंद्र सरकार व राज्य सरकाच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *