Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एल अँड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेड (एलटीएफएच) कडून प्रतिवर्षी ५.९९ टक्के दराने स्पर्धात्मक व्याजदरावर सुपर बाईक कर्ज योजनेचा शुभारंभ

६० महिन्यांपर्यंतच्या मुदतीसह २० लाख रुपयापर्यंतचा कर्जनिधी देणार

सर्व सुपर बाईक ओरिजिनल इक्विपमेंट उत्पादकांसाठी (OEMs) ही योजना लागू राहणार

आगामी ३-५ वर्षांमध्ये या विभागात सुमारे १५-१८ टक्के चक्रवाढ वार्षिक दराने (CAGR) वाढीची अपेक्षा

मुंबई, दि. २१: देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड (LTFH) ने आपल्या नवीन सुपर बाईक कर्ज योजनेची अधिकृत घोषणा केली आहे. सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मोटरसायकल चालवण्याच्या आनंददायी अनुभवासाठी आतुर असलेल्या इच्छुकांसाठी ही नवीन कर्जयोजना तयार करण्यात आलेली आहे.

अनुभवी, दिग्गज अथवा मोटरसायकलच्या जगात नवखे असलेल्या दुचाकीस्वारांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एलटीएफएचने प्रामुख्याने सुपर बाईक कर्जे योजनेची आखणी केलेली आहे. सदर योजना वित्तपुरवठा पर्यायांची विस्तृत श्रेणी दुचाकीस्वारांना प्रदान करते. याचबरोबर स्पर्धात्मक व्याजदर, सोयीस्कर परतफेडीच्या अटींसह हे कर्ज दिले जात आहे. तसेच वैयक्तिक ग्राहक सेवा प्रदान केली जात असल्याने ग्राहकांसाठी अखंड आणि त्रासविरहीत अनुभव सुनिश्चित होतो.

नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एलटीएफएचचे अर्बन फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गरयाली (Garyali) म्हणाले, “देशभरातील उत्साही लोकांसाठी उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटारसायकलींची सुलभता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या बाईक राईडची आवड जागृत करण्यासाठी खास तयार केलेल्या सुपर बाइक कर्ज योजनेचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होत आहे. एलटीएफएचमध्ये, आम्ही उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलची मालकी केवळ वाहतुकीसाठी नव्हे तर जीवनशैलीची निवड, आवड आणि एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकटीकरणे होय, अशी धारणा आहे. आमची कर्जे कोणत्याही मेक किंवा मॉडेलसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे देशभरातील ग्राहक या अनोख्या संधीचा लाभ घेऊ शकतील. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि ग्राहकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे सुपर बाईक विभागातील लक्षणीय वाढ संभव असल्याचा आमचा अंदाज आहे. सुपर बाईक हा एक किफायतशीर व्यवसाय विभाग आहे आणि पुढील ३-५ वर्षांमध्ये वार्षिक १५-१८ टक्के चक्रवाढ पध्दतीने (सीएजीआर) वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे. शिवाय, आमची योजना देशभरात उपलब्ध असताना, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोची यांसारख्या बाजारपेठांमध्ये आमच्या कर्ज योजनेला मागणी वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

एलटीएफएच सुपर बाईक कर्ज योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

स्पर्धात्मक व्याजदर: ६० महिन्यांपर्यंतच्या कालावधीसह ५.९९ टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या स्पर्धात्मक व्याजदराने कर्ज मिळू शकते. केवळ डिजीटलच नाही तर देशभरातील सर्व मूळ उपकरण निर्मात्यांना (OEMs) ही योजना उपलब्ध असेल. विशेष म्हणजे स्वयंरोजगारीत ग्राहकांकडून कोणताही प्रीमियम आकारला जाणार नाही.

सुलभ अर्ज प्रक्रिया: ग्राहकांनी आम्हाला फक्त त्यांचा बँकिंग तपशील प्रदान करणे आवश्यक आहे आणि आवश्यक माहिती एलटीएफएचद्वारे डिजिटल पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि त्रासाविना होईल. शिवाय, उद्योगाचा सरासरी ६-८ दिवसांचा असलेला कर्ज लाभ वेळेच्या (टर्न-अराउंड-टाइम) तुलनेत आमचा वेळ २४ तासांपेक्षासुध्दा कमी आहे.

वैयक्तिकृत ग्राहक सेवा: वैयक्तिक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी आमचे खास अनुभवी व्यावसायिक OEM च्या ठिकाणी उपलब्ध असतील. ते ग्राहकांना त्यांच्या गरजांसाठी परिपूर्ण वित्तपुरवठा उपाय शोधण्यात मदत करतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *