Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मार्च २०२४ मध्ये किरकोळ महागाई दर घसरण नोंदवत ४.८५ टक्क्यांवर

मार्च २०२४ साठी २०१२ = १०० हा पाया मानून त्यावर आधारित ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक

मुंबई, दि. १३: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मार्च २०२४ महिन्यासाठी (तात्पुरता) २०१२=१०० हा पाया मानून त्यावर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि ग्रामीण (आर), शहरी (यू) आणि एकत्रित ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (सीएफपीआय) जारी केला आहे. अखिल भारत आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-समूह आणि गटांसाठी देखील सीपीआय जारी केले जात आहेत.

भारतातील किरकोळ महागाई दर मार्चमध्ये वार्षिक आधारावर ४.८५ टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील महिन्यात ५.०९ टक्क्यांवर होता. औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले, जे आधीच्या महिन्यात ४.२ टक्के होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *