Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर-बेंगळुरू दरम्यानच्या थेट दैनंदिन विमान सेवेला दाखवला हिरवा झेंडा

या मार्गावरची सेवा इंडिगोकडून आठवड्यातून सातही दिवस दिली जाईल

या शहरांमधील वाढीव हवाई संपर्कामुळे या प्रदेशातील पर्यटन आणि व्यापार संधी वाढण्यास मदत होईल

कोल्हापूर, दि. १४: नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल डॉ. विजय कुमार सिंह (निवृत्त) यांनी आज कोल्हापूर ते बेंगळुरू थेट विमान सेवेचे उद्घाटन केले.

ही विमान सेवा १३ जानेवारीपासून खालील वेळापत्रकानुसार सुरू होईल:

Flight No. From To Departure Arrival Frequency Aircraft
6E – 7427 Bengaluru Kolhapur 14:50 16:45 Daily  

ATR

6E – 7436 Kolhapur Bengaluru 17:05 18:50 Daily

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, कोल्हापूरच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करून नवीन विमानतळ टर्मिनल बांधणे, धावपट्टीचा विस्तार करणे आणि एटीसी टॉवरची स्थापना यासाठी २४५ कोटींची गुंतवणूक निश्चित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, भारतातील प्रत्येक कानाकोपरा जोडण्याचा दृष्टीकोन आणि ध्येय पुढे नेत, या मार्गाच्या उद्घाटनाने कोल्हापूर हे हैदराबाद, तिरुपती, मुंबई, अहमदाबाद आणि आज भारताची सिलिकॉन राजधानी बेंगळुरूशी जोडले गेले आहे. मंत्री पुढे म्हणाले की, ही कनेक्टिव्हिटी सुरू झाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि दोन्ही शहरांतील लोकांना त्याचा फायदा होईल.

Image

जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी ही कनेक्टिव्हिटी मिळाल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन केले, ज्यामुळे परिसरातील व्यवसाय, व्यापार आणि पर्यटन संधी वाढण्यास मदत होईल.

लोकसभेचे खासदार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार रुतुराज संजय पाटील आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. याशिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव एस. के. मिश्रा, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग आणि नागरी हवाई मंत्रालयातले प्रतिनिधी (MoCA), भारतीय विमान प्राधिकरणाचे प्रतिनिधी (AAI), इंडिगो विमान कंपनीतले प्रतिनिधी(IndiGo) आणि कोल्हापूर येथील स्थानिक प्रशासनातील इतर मान्यवरही उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *