Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून कोल्हापुरातल्या रंकाळा तलावाजवळून गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून कोल्हापुरातल्या रंकाळा तलावाजवळून गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर, दि. ११:  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक १ कडून वाहनासह १४ लाख २८ हजार ६०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत ९ लाख ७८ हजार ६०० रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस. एम. मस्करे यांनी दिली आहे.

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर-नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक १ ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ रजि.क्र. MH-07-P-4755 येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले विविध ब्रँडचे १८०, ५०० तसेच ७५० मिलीचे एकुण १५१ बॉक्स आढळून आले.

या प्रकरणी प्रसाद महादेव नराम मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग या व्यक्तीस अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या गाडीत मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला. अटक केलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरु आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *