Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमेरिकेच्या फॅशन ब्रँडकडून ३०,००० मीटर ‘खादी डेनिम’ कापडाची खरेदी

अमेरिकेच्या फॅशन ब्रँडकडून ३०,००० मीटर खादी डेनिम कापडाची खरेदी

शाश्वत आणि शुद्धता यांचे प्रतिक असलेल्या खादीने जागतिक फॅशन विश्वात मोठी भरारी घेतली आहे. अमेरिका स्थित जागतिक स्तरावरचा अग्रगण्य फॅशन ब्रँड, ‘पॅटागोनिया’, डेनिम कपडे तयार करण्यासाठी आता हाती बनवलेल्या खादी डेनिमचा उपयोग करत आहे. पॅटागोनियाने, वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या नामांकित अरविंद मिल्स द्वारे १.०८ कोटी रुपये किमतीच्या सुमारे ३०,००० मीटर खादी डेनिम कापडाची गुजरातमधून खरेदी केली आहे.

जुलै २०१७ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी), अहमदाबाद इथल्या अरविंद मिल्स समवेत, खादी डेनिम उत्पादनाचा जगभरात व्यापार करण्यासाठी करार केला. तेव्हापासून अरविंद मिल्स, गुजरातमधल्या, केव्हीआयसीचे प्रमाणित खादी संस्थांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खादी डेनिम कापडाची खरेदी करत आहे.

पॅटागोनियाच्या खादी डेनिम खरेदीमुळे, खादी कारागीरांसाठी अतिरिक्त १.८० लाख मनुष्य तास म्हणजेच २७,७२० मानव दिवस कामाची निर्मिती झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये कामाची ऑर्डर नोंदवण्यात आली आणि नियोजित १२ महिन्याच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये याची पूर्तता करण्यात आली.

खरेदीला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी पॅटागोनियाने, जागतिक मुल्यांकन करणाऱ्या एनईएसटी, नेस्ट या अमेरिका स्थित त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली. गोंडाळ इथे डेनिम उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे म्हणजेच कताई, विणणे, कार्डिंग, डायिंग, मजुरी, मजुरांच्या वयाची पडताळणी यासारख्या उत्पादनाशी निगडीत संपूर्ण प्रक्रियेचे मुल्यांकन करण्यासाठी ही त्रयस्थाची नियुक्ती करण्यात आली. नेस्टने उद्योग भारती इथे सर्व निकषांचे मुल्यांकन केल्यानंतर कताई आणि हातमाग विणकाम, नेस्टचे हस्तकला सील साठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले. देशातल्या खादी संस्थेच्या कार्यव्यवहारात, नैतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय त्रयस्थ मुल्यांकन कर्त्याकडून, प्रमाणपत्र आणि मुल्यांकनाची ही पहिलीच वेळ आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *