Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कश्यप भाई, मेरा पॅक अप हो गया है” वाचा का पानिपतच्या चित्रीकरणा दरम्यान अर्जुन कपूर, कश्यप परुळेकर ला असं म्हणाला

“कश्यप भाई, मेरा पॅक अप हो गया है” वाचा का पानिपतच्या चित्रीकरणा दरम्यान अर्जुन कपूर, कश्यप परुळेकर ला असं म्हणाला

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बहुचर्चित “पानिपत” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण याच सोबत अनके मराठी नट चंदेरी पडद्यावर झळकले. यात सर्वात जास्त लक्षात राहिला तो कश्यप परूळेकर ज्याने बाजीराव पेशव्यांच्या पुत्राची म्हणजेच रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादा ची भूमिका वठवली आहे. हा अटकेपार झेंडा रोवलेला राघोबादादा आणि सदाशिवराव भाऊ या दोघांमध्यले वाद तर लक्षवेधी ठरले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कश्यप ला अर्जुन कपूर मधली व्यावसायिकता आणि तितकिच माणुसकीही अनुभवता आली.

असाच एक किस्सा कश्यप ने शेअर केला आहे.

“एक किस्सा…(थोडक्यात)
पानिपत फिल्म शूटिंग…
सीन असा होता…
शनिवार वाड्यावर खबर येते, नजीब ने दत्ताजी शिंदे ची हत्या केली. एकाएक शनिवार वाड्यात शांतता पसरते. दत्ताजी गेल्याबद्दलचं दुखः आणि नजीब बद्दलचा संताप. आणि वर, अब्दाली हिंदुस्थानावर कब्जा करायला एक लाख फौज घेऊन निघालाय.
दिवसभर सीन शूट करत होतो, शेवटी २ शॉट्स राहिले होते आणि मग पॅक अप. पहिला क्लोज शॉट अर्जुन कपूरचा, आणि मग दुसरा माझा काउंटर क्लोज शॉट. अर्जुन म्हणजे सदाशिव भाऊ आणि मी म्हणजे राघोबा ला उद्देशून काही बोलतो आणि राघोबा त्यावर रिअँक्ट होतो. अर्जुन चा शॉट ओके झाला आणि त्याला पॅक अप सांगण्यात आलं. आता माझा शॉट असेल म्हणून मी मॉनिटर जवळच बसून होतो. अर्जुन, पॅक अप सांगून ही निघाला नाही आणि तो माझ्या दिशेने चालत आला, मला म्हणाला,
अर्जुन: कश्यप भाई, मेरा पॅक अप हो गया है, लेकीन मेरे लाईन्स पर आपको रिअॅक्ट होना है, तो आपको लाईन्स देने के लिये में रुकता हू!
मी: नही अर्जुन भाई, मैने आपका शॉट देखा, मुझे याद है, में अपना शॉट दे दुंगा, आपको रुकने की जरुरत नहीं है!
अर्जुन: R u sure?? तो में निकलू??
मी: हां अर्जुन भाई आप जा सकते हो, no problem! Thanks for asking.
मग मी माझा शॉट दिला, ओके झाला आणि पॅक अप झालं.
घडल्या प्रकाराने मला अर्जुन कपूर चा हा professionalism खूप आवडला. तो पॅक अप सांगितल्यावर सरळ निघून गेला असता तरी त्याला कोणी काही बोललं नसतं आणि मला ही काही प्रोब्लेम नसताच झाला. पण तरी त्याने मी सहकलाकार म्हणून माझ्याबद्दल आदर दाखवला. मला आवडलं ते. त्याच्या बद्दल मला असलेला आदर आणखी वाढला. हेच healthy atmosphere मी कायम आशुतोष गोवरीकरांच्या सेट वर अनुभवलंय.”

https://m.facebook.com/story.php?story_fbid=160149908675062&id=113314006691986

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *