Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चांद्रयान – 3 चंद्राच्या आणखी जवळ जाण्याचा मार्ग सुकर

चांद्रयान – ३ ची कक्षा कमी करुन ते चंद्राच्या अधिक जवळ नेण्याचा दुसरा टप्पा यशस्वी

चांद्रयान – ३ ची कक्षा कमी करुन ते चंद्राच्या अधिक जवळ नेण्याचा दुसरा टप्पा आज यशस्वी झाला. यापुढचा टप्पा येत्या बुधवारी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. इस्रोने या महिन्याच्या ९ तारखेला यान चंद्राच्या कक्षेजवळ आणण्याचा एक प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला होता.

चांद्रयान-३ हे गेल्या महिन्याच्या १४  तारखेला प्रक्षेपित करण्यात आलं आणि ५ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत दाखल झालं. १७ ऑगस्टपर्यंत लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेले लँडिंग मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूलपासून दूर जाईल. यानंतर, चंद्रावर अंतिम उतरण्यापूर्वी लँडरवर डी-ऑर्बिटिंगचे प्रयत्न केले जातील. इस्रो २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *