माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे छापे
कोल्हापूर, दि. १२: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरी आज पहाटे पुन्हा ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने छापा टाकला. सुमारे २६ अधिकाऱ्यांच्या पथकानं याठिकाणी कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.
मुश्रीफ यांचे समर्थक आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरीही ईडीनं छापा टाकला आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणीच ईडीनं हे छापे टाकल्याचं सनजतं. राजकीय हेतूनं ही कारवाई होत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच कागल बंद ठेवण्याची घोषणा मागे घेण्याचीही विनंती केली. यापूर्वी जुलै २०१९ मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.
Source – AIR