Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मे २०२२ मध्ये १,४०,८८४ कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलन; वार्षिक ४४% वाढ

जीएसटी लागू झाल्यापासून जीएसटी संकलनाने चौथ्यांदा आणि मार्च २०२२ पासून सलग तिसऱ्या महिन्यात १.४० लाख कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली/मुंबई, दि.१: मे २०२२ मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन १,४०,८८५ कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २५,०३६ कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ३२,००१ कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी ७३,३४५ कोटी  रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या ३७४६९ कोटींसह) आणि उपकर १०,५०२ कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या ९३१ कोटी रुपये स ) यांचा समावेश आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला २७,९२४ कोटी रुपये  आणि  एसजीएसटीला २३,१२३ कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर मे २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ५२,९६० कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ५५,१२४ कोटी रुपये आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने ३१.०५.२०२२ रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ८६,९१२ कोटी रुपये जीएसटी भरपाई देखील जारी केली आहे.

मे २०२२ चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा ४४% जास्त आहे. या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल ४३% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा ४४% अधिक आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने चौथ्यांदा तर मार्च २०२२ पासून सलग तिसऱ्या महिन्यात १.४० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्यातील संकलन, जे एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या परताव्याशी संबंधित आहे, ते एप्रिलमध्ये  नेहमीच कमी असते. मात्र तरीही मे २०२२ मध्ये, जीएसटी महसूलाने १.४० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल २०२२ मध्ये  एकूण ई-वे बिलांची संख्या ७.४० कोटी होती, जी मार्च २०२२ मधील  ७.७० कोटी ई-वे बिलांपेक्षा 4% कमी आहे.

एप्रिल २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक एकूण जीएसटी महसुलातील कल दाखवला आहे. मे २०२१ च्या तुलनेत मे २०२२ मध्ये प्रत्येक राज्यात संकलित जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

State-wise growth of GST Revenues during May 2022[1]

State May-21 May-22 Growth
Jammu and Kashmir 232 372 60%
Himachal Pradesh 540 741 37%
Punjab 1,266 1,833 45%
Chandigarh 130 167 29%
Uttarakhand 893 1,309 46%
Haryana 4,663 6,663 43%
Delhi 2,771 4,113 48%
Rajasthan 2,464 3,789 54%
Uttar Pradesh 4,710 6,670 42%
Bihar 849 1,178 39%
Sikkim 250 279 12%
Arunachal Pradesh 36 82 124%
Nagaland 29 49 67%
Manipur 22 47 120%
Mizoram 15 25 70%
Tripura 39 65 67%
Meghalaya 124 174 40%
Assam 770 1,062 38%
West Bengal 3,590 4,896 36%
Jharkhand 2,013 2,468 23%
Odisha 3,197 3,956 24%
Chattisgarh 2,026 2,627 30%
Madhya Pradesh 1,928 2,746 42%
Gujarat 6,382 9,321 46%
Daman and Diu 0 0 153%
Dadra and Nagar Haveli 228 300 31%
Maharashtra 13,565 20,313 50%
Karnataka 5,754 9,232 60%
Goa 229 461 101%
Lakshadweep 0 1 148%
Kerala 1,147 2,064 80%
Tamil Nadu 5,592 7,910 41%
Puducherry 123 181 47%
Andaman and Nicobar Islands 48 24 -50%
Telangana 2,984 3,982 33%
Andhra Pradesh 2,074 3,047 47%
Ladakh 5 12 134%
Other Territory 121 185 52%
Center Jurisdiction 141 140 0%
Grand Total 70,951 1,02,485 44%

J

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *