Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सप्टेंबर २०२२ या एकाच महिन्यात एकूण १,४७,६८६ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन

सलग सात महिने मासिक जीएसटी महसूल, १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक

नवी दिल्ली, दि. १ : सप्टेंबर 2022 ह्या एकाच महिन्यात, देशांत एकूण जीएसटी महसूल संकलन, 1,47,686 कोटी इतके झाले असून, त्यात सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) संकलन 25,271 कोटी रुपये तर एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर) संकलन 31,813 कोटी रुपये इतके आहे. तर आयजीएसटी 80,464 कोटी रुपये आहे. ( यात, 41,215 कोटी रुपये मालाच्या आयातीवरील शुल्काचाही समावेश) आणि उपकर म्हणजे सेस-10,137 कोटी रुपये इतका आहे (यातही मालाच्या आयातीवरील 856 कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे.)

सरकारने नियमित समझोत्याच्या आधारावर, आयजीएसटी मधून 31,880 कोटी, सीजीएसटी तर, 27,403 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून धरले आहेत. या दोन्ही विभाजनानंतर, केंद्र आणि राज्य सरकारांचे सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलन, 57,151(CGST) आणि 59,216 (SGST) इतके आहे.

सप्टेंबर 2022 मधील महसूल संकलन, गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील जीएसटी महसूल  संकलनाच्या तुलनेत, 26 टक्के अधिक आहे.  या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल, गेल्यावर्षीच्या तुलनेत, 39% अधिक होता. तर, देशांतर्गत व्यवहारातून संकलित झालेला महसूल गेल्यावर्षी पेक्षा, 22%  अधिक होता.

जीएसटी संकलन सातत्याने, अधिक असण्याचा हा आठवा महिना असून, गेले सलग सात महीने, जीएसटी महसूल संकलन, 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून, सप्टेंबर 2022 पर्यंत, जीएसटी संकलनात, 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट, 2022 मध्ये देशांत, 7.7 कोटी ई-वे बिल्स  तयार झाले, जुलै, 2022 च्या 7.5 कोटी बिलांच्या तुलनेत, हा आकडा लक्षणीयरित्या अधिक होता.

या महिन्यात, 20 सप्टेंबर या एकाच दिवशी 49,453 कोटी रुपये महसूल संकलन झाले.. आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 8.77 लाख चालान भरले गेले. याआधी, केवळ जुलै महिन्यात, म्हणजे आर्थिक वर्ष परतावे भरण्याची मुदत संपत असतांना, 20 जुलै ह्या एकाच दिवशी, सप्टेंबरपेक्षा अधिक, म्हणजे, 57,846 कोटी रुपये 9.58 लाख चालान (पावत्या) मधून भरले गेले होते. या  चालानच्या विक्रमी संख्येचा स्पष्ट अर्थ हाच आहे, की, जीएसटीएनचे जीएसटी पोर्टल, आता निर्वेधपणे, स्थिर काम करत आहे.

सप्टेंबर महिन्यात, आणखी एक मैलाचा दगड पार करण्यात आला. या महिन्यात,30 सप्टेंबरपर्यंत  एकूण 1.1 कोटी ई-वे बिल्स आणि ई-इनव्हॉईसेस तयार करण्यात आले. (यात, 72.94 लाख ई-इनव्हॉईसेस आणि 37.74 लाख  ई-वे बिल्स). एनआयसीच्या पोर्टलवर  या कामात कुठलाही अडथळा आला नाही.

खालील तक्ता, चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील बदलते कल दर्शवितो. त्या खालील तक्त्यात, सप्टेंबर 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटी महसूलाची राज्यनिहाय आकडेवारी आहे.

 

State-wise growth of GST Revenues during September 2022

State Sep-21 Sep-22 Growth
Jammu and Kashmir 377 428 13%
Himachal Pradesh 680 712 5%
Punjab 1,402 1,710 22%
Chandigarh 152 206 35%
Uttarakhand 1,131 1,300 15%
Haryana 5,577 7,403 33%
Delhi 3,605 4,741 32%
Rajasthan 2,959 3,307 12%
Uttar Pradesh 5,692 7,004 23%
Bihar 876 1,466 67%
Sikkim 260 285 9%
Arunachal Pradesh 55 64 16%
Nagaland 30 49 61%
Manipur 33 38 17%
Mizoram 20 24 22%
Tripura 50 65 29%
Meghalaya 120 161 35%
Assam 968 1,157 20%
West Bengal 3,778 4,804 27%
Jharkhand 2,198 2,463 12%
Odisha 3,326 3,765 13%
Chattisgarh 2,233 2,269 2%
Madhya Pradesh 2,329 2,711 16%
Gujarat 7,780 9,020 16%
Daman and Diu 0 0 -38%
Dadra and Nagar Haveli 304 312 3%
Maharashtra 16,584 21,403 29%
Karnataka 7,783 9,760 25%
Goa 319 429 35%
Lakshadweep 0 3 731%
Kerala 1,764 2,246 27%
Tamil Nadu 7,842 8,637 10%
Puducherry 160 188 18%
Andaman and Nicobar Islands 20 33 69%
Telangana 3,494 3,915 12%
Andhra Pradesh 2,595 3,132 21%
Ladakh 15 19 27%
Other Territory 132 202 53%
Center Jurisdiction 191 182 -5%
Grand Total 86,832 1,05,615 22%

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *