या कालावधीत एकूण २ लाख १३ हजार सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद
नवी दिल्ली/मुंबई, दि. २७: मागील ३ आर्थिक वर्षांत देशात २ लाख १३ हजार सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज दिली. आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ या काळात डेबिट- क्रेडिट कार्ड स्वॅपिंग,बनावट कार्ड तयार करणे आणि हॅकिंग अशा इंटरनेट बँकिंग बाबतच्या आर्थिक गुन्ह्याच्या माध्यमातून ७३१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार निदर्शनास आले आहेत, अशी माहिती अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
हे आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एटीएम, सिम कार्ड च्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक, तसंच मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून बँकेच्या सर्व्हर वरील ग्राहकांची माहिती चोरीला जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी काही सुरक्षा निर्देश आणि सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Source – AIR
