Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोबाईल संदेशाद्वार आपत्तीबद्दलची शीघ्र माहिती देणारी, भारतात विकसित सी-डॉटची प्रणाली ठरली संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी २०२४ या पुरस्काराच्या पुढच्या फेरीसाठी पात्र

मोबाईल संदेशाद्वार आपत्तीबद्दलची शीघ्र माहिती देणारी, भारतात विकसित सी-डॉटची प्रणाली ठरली संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी २०२४ या पुरस्काराच्या पुढच्या फेरीसाठी पात्र

मुंबई, दि. २४: वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी (डब्ल्यूएसआयएस) पुरस्कारासाठी, केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या टेलिमॅटिक्स विकास केंद्राने (सी-डॉट) संशोधन करून विकसित केलेली प्रणाली पात्र ठरली आहे. “ई पर्यावरण-जीवनाच्या सर्व बाजूंना होणारे लाभ”, या श्रेणीत प्राप्त, एक हजारापेक्षा जास्त प्रवेशिकांमध्ये या प्रणालीचा समावेश आहे. “मोबाईल – इनेबल्ड डिझास्टर रेझिलिअन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट एमर्जन्सी अलर्टिंग” अर्थात “सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्टिंगद्वारे मोबाईलवरून आपत्ती निवारण” करणारी ही प्रणाली आहे.

संयुक्त राष्ट्रांतर्फे डब्ल्यूएसआयएस वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी या परिषदा आयोजित केल्या जातात तर आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयु) आणि स्विस महासंघ हे सहआयोजक आहेत. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान आणि त्याचा समाजावर पडणार प्रभाव यावर या परिषदांमध्ये भर दिला जातो. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा लाभ घेत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठणाऱ्या उत्तम प्रकल्प/योगदानाला हा डब्ल्यूएसआयएस पुरस्कार दिला जातो

भारतात विकसित झालेली आणि स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेली सी-डॉटची ही प्रणाली अद्ययावत आणि अत्याधुनिक आहे. गंभीर आपत्तीच्या वेळी मोबाइलवर जीवरक्षक महत्त्वाची माहिती तातडीने देणारी ही दूरसंचार प्रसारण प्रणाली आहे. वेगळा टोन आणि पॉपअप नोटिफिकेशन याद्वारे मोबाईल संदेश दिल्यामुळे वापरकर्त्यांचे लक्ष वेधले जाऊन त्यांना वास्तविक वेळेची अचूकता साधत, संकटकालीन परिस्थितीत प्रभावी इशारा देता येतो. या प्रणालीबरोबरच त्याच श्रेणीत आणखी काही प्रकल्प पात्र ठरले आहेत. मतदानानंतर ज्या प्रकल्पांना अधिक मते मिळतील ते प्रकल्प पुढील फेरीत स्थान मिळवतील.

सी-डॉट प्रणाली ही जीवरक्षक प्रणाली असून, या प्रकल्पाला दिले जाणारे मत हे मेक इन इंडियाला पाठबळ देण्यासारखे असल्यामुळे या प्रकल्पाला मत द्यावे, असे आवाहन सी- डॉटने केले आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत मतदानाची लिंक खुली राहील. आपत्तीच्या काळात या प्रणालीच्या वापरामुळे मौल्यवान जीव वाचू शकतात, त्यामुळे सी-डॉटच्या या प्रकल्पासाठी मतदान करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

मतदानाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी पुरस्कार २०२४ साठी सी-डॉटच्या “मोबाईल – इनेबल्ड डिझास्टर रेझिलिअन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट एमर्जन्सी अलर्टिंग” साठी मतदान करण्याची प्रक्रिया:

1. मतदान संकेतस्थळाला भेट द्या: https://www.itu.int/net4/wsis/stocktaking/Prizes/2024

2. व्होट बटन दाबा

3. तुमच्या ईमेल आयडीसह नोंदणी करा आणि आवश्यक तपशील सामायिक करा आणि ईमेल आयडी सत्यापित करा. आधीच नोंदणीकृत असल्यास, क्रेडेन्शियल प्रविष्ट करा आणि लॉग इन करा:

4. “व्होटिंग फॉर्म” वर क्लिक करा

5. फॉर्म उघडल्यानंतर, ड्रॉपडाउन निवड सूचीमधून “C7, E-environment” निवडा.

6. C-DOT च्या प्रकल्पासाठी मत द्या: Mobile-enabled Disaster Resilience through Cell Broadcast Emergency Alerting

7. मतदानानंतर तुम्ही “My Votes” विभागातून तुमचे मत तपासू शकता.9869516882/9594769786

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *