Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कागदपत्रांच्या ‘स्कॅनिंग’साठी ‘कॅमस्कॅनर’ चिनी ऍप विसरा; ‘हे’ १०० टक्के भारतीय ऍप वापरा

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी स्कॅनिंग ॲपसाठी भारतीय पर्याय विकसित केला

मुंबई: केंद्र सरकारने ५९ चीनी मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कॅनिंगसाठी आयआयटी मुंबईच्या रोहित कुमार चौधरी व केविन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आव्हानातून प्रेरणा घेऊन या विद्यार्थ्यांनी हे मोफत ॲप तयार केले आहे.

एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे मोबाईल ॲपचे नाव असून, १५ ऑगस्ट २०२० रोजी, म्हणजेच स्वातंत्र्यदिनी, त्याचा शुभारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence) ॲप कागदपत्रं स्कॅन करण्याबरोबरच ज्यांना इंग्रजी वाचनात अडचण आहे, त्यांच्यासाठी कागदपत्रांचे वाचन करेल.

 

या ॲपविषयी सांगताना रोहित कुमार चौधरी म्हणाला, “सुरुवातीला आम्ही ज्यांना इंग्रजी वाचन कठीण जाते, त्यांच्यासाठी ॲप तयार करण्यावर काम करत होतो. त्याच दरम्यान सरकारने मोबाईल स्कॅनरसह चिनी कंपन्यांच्या ॲपवर बंदी घातली. कॅम स्कॅनर या ॲपवर बंदी घातल्यानंतर आम्ही सर्वेक्षण केले की, लोकांना मोबाईल फोनच्या माध्यमातून कागदपत्रं स्कॅन करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर आम्ही आमच्या एआयआर ॲपमध्ये स्कॅनिंग जोडण्याचा निर्णय घेतला”.

या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षितता आहे. तुम्ही मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन केलेली कागदपत्रं पीडीएफ स्वरुपात जतन केली जातात. एआयर स्कॅनर ॲप वापरकर्त्यांची कोणतीही माहिती गोळा करत नाही आणि सर्व कागदपत्रे फोनच्या लोकल स्टोअरेजमध्ये साठवली जातात. यासाठी आम्ही क्लाऊड स्टोअरेजचा वापर करत नाही. त्यामुळे यात वापरकर्त्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी आहे, असे रोहित कुमार म्हणाले.

प्ले स्टोअरवर आतापर्यंत १५०० जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. सध्या ॲप अँड्रॉईड फोनधारकांसाठी उपलब्ध आहे, लवकरच तो आयओएस वापरकर्त्यांनाही उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.hind.airscanner या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *