
“बाळासाहेबांच्या आशिर्वादाने शिक्षण संस्थेची स्थापना करु शकलो” – बबन पाटील
उरण, दि. २४ (विठ्ठल ममताबादे): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत, तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिसीपी पंकज डहाणे, तर प्रमुख पाहूणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा जितेंद्र सोनावणे व संस्थेचे संस्थापक बबन पाटील हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे नियोजन विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेश साखरे यांनी केले.
यावेळी बोलताना संस्थापक बबन पाटील म्हणाले कि, “लहानपणी शाळा शिकताना खूप त्रास सहन केला. पण तरुणपणात वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची साथ मिळाली आणि त्यांच्या आशिर्वादाने या भव्य दिव्य अशा कमळ गौरी हिरू पाटील या शिक्षण संस्थेची स्थापना करु शकलो. त्यामूळे आज तळागाळातील मूलांना शिक्षण देवू शकलो याचं समाधान आहे.
यावेळी प्राध्यापक डॉ. रामकृष्ण नायक, प्राध्यापक डॉ. राठोड सर, प्राध्यापिका पुजा चव्हाण, प्राध्यापिका वैशाली बोराडे, प्राध्यापिका प्राजक्ता औटी तसेच मुंबई युनिव्हर्सिटी कोओर्डिनेटर अमित सूर्यवंशी व लायब्ररी प्रमुख शकुंतला मॅडम यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर विद्यार्थी प्रतिनीधी विकेश पवार, आश्विनी कटारे, प्रताप जाधव, विश्वजित राठोर, तन्वीर ठाकूर, सनील सरकार, प्रखर सुराणा, हर्ष जगे, मंदार पाटील, द्वितीया कांबळे, सायली गुरव, रुतुजा पवार, मानसी शिर्के, जागृती पाटील, गौरव खांडेकर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
“आपल्या आशिलाची बाजू मांडताना आशिलाच्या गैरकृत्यात समाविष्ट होवू नका”
— डिसीपी पंकज डहाणे, नवी मुंबई पोलिस
कमळ गौरी हिरू पाटील या शिक्षण संस्थेचे विधीमहाविद्यालय २०१६ पासून तळोजा येथे सूरु झाले. २०२३ हे पदवीदान समारंभाचे चौथे वर्ष आहे. यावर्षी २०२२ च्या ४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.