बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे
मुंबई, दि. १०: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन चालवलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले. या प्रकरणातले दोन आरोपी संबंधित शाळेचे विश्वस्त असून ते अद्याप फरार आहेत.
या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पहात आहात का असा सवाल खंडपीठाने पोलिसांना केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख सुनावणीला हजर नसल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुढची सुनावणी येत्या २३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलेली आहे.
Source – AIR