Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ग्रामीण-निमशहरी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे नवीन सुविधांचा शुभारंभ

एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे ‘स्वदेश सेविंग्‍स अकाउंट’ आणि ‘स्वदेश करंट अकाउंट’ सुविधेचा शुभारंभ

एयू स्वदेश सेविंग्‍स अकाउंट ग्राहकांना डिजिटल समावेशासाठी डेबिट कार्डावरील खरेदी, बिल पेमेंट, इंधन खर्च आणि एयू 0101 द्वारे रिचार्जवर ५% कॅशबॅकची सुविधा प्रदान करते

एयू स्वदेश करंट अकाउंट हंगामी व्यवसाय चक्रात अकाउंट मध्ये  शिल्लक देखभाल आणि मासिक व्यवहारांच्या बाबतीत संपूर्ण लवचिकता प्रदान करते

मुंबई, दि. ८: भारतातील सर्वात मोठी एसएफबी असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या स्वदेश शाखांमधील ग्राहकांसाठी बँक खात्याचे दोन खास प्रकार आणले आहेत. ‘एयू स्वदेश  सेविंग्‍स अकाउंट’ आणि ‘एयू स्वदेश करंट अकाउंट’ अशी या नाविन्यपुर्ण खात्यांची नावे आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांसाठी नाविन्यता देणे, ग्राहककेद्रीत बँकींग पर्याय प्रदान करणे आणि तंत्रज्ञान व डिजीटल बँकींगचा वापर करण्याची एयू एसएफबीची वचनबध्दता या विशेष बँकींग अकाउंटच्या माध्यमातून प्रकट होते.

एयू स्वदेश सेविंग्‍स अकाउंट’ उच्चतम व्याजदर प्रदान करण्याबरोबरच व्यवहार केवळ सरळसोपेच करत नाही तर ग्राहकांना विविध लाभही प्रदान करते. हे खाते डेबिट कार्डच्या माध्यमातून केली जाणारी खरेदी (यात इंधन खऱेदीचा समावेश), बिलभरणा आणि डिजीटल समावेशकतेसाठी सुरु करण्यात आलेल्या एयू 0101 अॅपच्या AU0101 App माध्यमातून रिचार्ज आदींसाठी पाच टक्के कॅशबॅक प्रदान करते. रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डशी संलग्न असलेली ही खाती दोन लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा तर पाच लाखांचा विमान प्रवास अपघाती विमा असे सुरक्षाकवचही प्रदान करते. तसेच विमानतळांवरील लाँज वापरण्याची पूरक सुविधाही संबंधित खातेदारास प्रदान करते. हे सेविंग्‍स अकाउंट ‘ग्राहकांना सेविंग्‍स अकाउंट’ किंवा निश्चित ठेवींमध्ये शिल्लक राखण्यासाठी लवचिकतासुध्दा प्रदान करते. यात खातेदार आपल्या सेविंग्‍स अकाउंट मध्ये तिमाहीसाठी किमान दहा हजार रुपये शिल्लक राखू शकतात अथवा मुदत ठेवीत एक लाख रुपये ठेवू शकतात.

ग्रामीण भागातील व्यवसायाचे स्वरुप चक्रीय स्वरुपांचे असल्याने तेथे उच्च व्यवहारांच्या कालावधीत रोख व्यवहारांचे प्रमाण उंचावते आणि त्यानंतर व्यवहार रोडावत जातात. परिणामी ग्रामीण भागात करंट अकाउंट  मध्ये अनेकदा किमान शिल्लक राखण्यात अडचण येऊन खातेदारांसमोर सामान्य आव्हाने निर्माण होते आणि त्यातून शुल्क आकारणी आणि इतर विसंगती निर्माण होतात. व्यवहारांचे स्वरुप आणि विशिष्ट वर्गाच्या गरजा लक्षात घेत एयू स्मॉल फायनान्स बँकेने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एयू स्वदेश करंट अकाउंट तयार केले आहे. कोणत्याही अनिवार्य किमान शिल्लक आवश्यकतेशिवाय करंट अकाऊंट खातेदारास शिल्लक देखभाल आणि मासिक व्यवहारांच्या बाबतीत लवचिकता प्रदान केली जाते, तसेच डेबिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या खर्चावर तसेच  डिजिटल व्यवहारांवर मासिक कॅशबॅकचा लाभसुध्दा प्रदान केला जातो.

एयू स्वदेश करंट अकाउंट मागील महिन्याच्या राखीव सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) च्या १५ पट रोख ठेव मर्यादा प्रदान करते. त्याचबरोबर अन्य वैशिष्ट्यांसह प्रति महिना १५० विनामूल्य धनादेश, अखंड पेमेंट आणि २० पेक्षा अधिक विनामूल्य बँकिंग सेवा प्रदान करते. या खात्याला व्हिसा प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्डची जोड देण्यात आलेली आहे आणि उच्च व्यवहार मर्यादा, खरेदी संरक्षण, वर्धित विमा संरक्षण आणि भारतातील आघाडीच्या ब्रँडमध्ये विशेष ऑफर आणि नानाविध सवलतीसुध्दा देण्यात आलेली आहे.

स्वदेश सेविंग्‍स आणि करंट अकाउंटच्या शुभारंभप्रकरणी टिप्पणी करताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिब्रेवाल (Tibrewal) म्हणाले, “एयू स्वदेश सेविंग्‍स अकाउंट ‘ आणि एयू स्वदेश च करंट अकाउंटच्या शुभारंभाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या मौल्यवान स्वदेश ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी अद्वितीयपणे ही खाती तयार करण्यात आलेली आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात सुलभ बँकिंग पर्याय सादर करत आर्थिक आणि डिजिटल समावेशनाला चालना देण्यासाठी आमची वचनबद्धता या खात्याच्या माध्यमातून अधोरेखित होते. आम्हाला विश्वास आहे की, या सुविधा आमच्या खातेदारांना सक्षम बनवतील आणि त्यांचा बँकिंग अनुभव उच्च स्तरावर जाईल.”

उत्तम टिब्रेवाल पुढे म्हणाले, “एयू स्वदेश सेविंग्‍स अकाउंट’ आणि एयू स्वदेश करंट अकाउंट तयार करताना, आमचे प्राथमिक ध्येय भारतातील ग्रामीण आणि निम-शहरी भागातील बँकिंग ग्राहकांना सक्षम बनवणे हे होते. ही दोन्ही विशेष खाती ग्राहकांना त्यांच्या निधीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याची क्षमता प्रदान करतात. त्याचबरोबर आर्थिक संसाधने हंगामी पध्दतीने बदलणाऱ्या क्षेत्रात ही खाती पुरेशी लवचिकतासुध्दा देतात. यामुळे बँकिंग ग्राहकांवरील कडक शिलकी अटींचे ओझे तर दूर होतेच, पण त्यांना बँकिंग आर्थिक प्रणालीमध्ये अधिक सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहनही मिळते.”

सप्टेंबर २०२३ मध्ये, एयू एसएफबीने धोरणात्मकरीत्या स्वदेश बँकिंगची स्थापना केली असून त्यामुळे बँकेच्या आर्थिक समावेशाचा वारसा, ग्रामीण आणि निम-शहरी बाजारपेठांचे विस्तृत ज्ञानही विस्तारले आहे. तसेच भारतातील शेतकरी, स्वयंरोजगारीत व्यक्ती आणि सूक्ष्म-उद्योगांसाठी बँकेने सर्वसमावेशक असे संपुर्ण बँकींग पर्यायही दिले आहेत. हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी, एयू एसएफबीने त्याच्या ग्रामीण शाखा, बँकिंग आऊटलेट्स, बँकिंग प्रतिनिधी, वित्तीय आणि डिजिटल समावेशन युनिट तसेच लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी (एसएमएफ) कर्ज देणारी युनिट्स एका एकीकृत छत्राखाली आणि नेतृत्वाखाली समुदायित केली आहेत. बँकेच्या ग्राहकांना एकूण फायदा वाढवणे, हा त्यामागील उद्देश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *