
एक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ चौधरी यांचे ॲमिटी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यातील कार्यक्रमात प्रतिपादन
ॲमिटी विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा संपन्न. मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल
मुंबई, दि. २३: ॲमिटी विद्यापीठ मुंबईचा दुसरा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. यावेळी साडे तीन हजार विद्यार्थ्यांसहित मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. एक्सिस बँकेचे एमडी अमिताभ चौधरी, कँसरतज्ज्ञ डॉक्टर राजीव अग्रवाल, प्रसिध्द वकिल निशिथ देसाई आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संस्थापक डीन रॉबर्ट सस्किंड यांना मानद पदवी देण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. असीम चौहान आणि कुलगुरु डॉ. ए. डब्ल्यू. संतोष कुमार यांच्या हस्ते हा पदवीदान कार्यक्रम पार पडला.
गेल्या काही दिवसांत एक्सिस बँकेनं शेअर बाजारात कमालीची तेजी दाखवलेय. शिवाय नुकताच झालेला सिटी बँकेसोबतचा व्यवहार या उल्लेखनीय कामासाठी एमडी अमिताभ चौधरी यांचा डी.फील पदवी देण्यात आली. स्तनाचा कर्करोग आणि त्यावरच्या अद्ययावत शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजीव अग्रवाल यांना डी.एससी आणि न्यायप्रक्रियेत आमुलाग्र बदल सुचवणाऱ्या केसेस लढणारे वकिल निशिथ देसाई यांना एलएल.डी ही मानद पदवी देण्यात आली.
एक्सिस बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी आपल्या भाषणात भारताच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. ते म्हणाले, “भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. बँकींग क्षेत्रात अनेक बदल होतायत. त्यामुळं या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. गुंतवणुकदारांचा विश्वास वाढतोय. यामुळं भारतीय शेअर बाजारातही तेजी आहे.”
महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. बदलेली जीवनशैली, कॅन्सरबद्दल असलेली अजाणता ही या मागची प्रमुख कारणे आहेत. यासाठी अगदी गावपातळीवर लोकजागृती व्हायला हवी. असं मत प्रसिध्द सर्जिकल आँकोलॉजिस्ट राजीव अग्रवाल यांनी व्यक्त केलंय.
बाल आणि महिला आरोग्य संदर्भात प्रभावी काम करणाऱ्या डॉक्टरांना पदवी देण्यामागे याबाबतीत जागरुकता निर्माण करणं हा हेतू आहे. जगभरात कॅन्सरचा विळखा आवळला जात असताना थोडीशी काळजी आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन वेळेवर मिळाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे. म्हणूनच या दोघांचा सन्मान करत असल्याचं विद्यापीठाचे कुलपती असीम चौहान यांनी सांगितलं.
विद्यापीठातर्फे सुमारे साडे तीन हजार विद्यार्थ्यांच्या पदवीदानाचा कार्यक्रम बहाल करण्यात आला. २०१० ते २०२३ या कालावधीसाठी हा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात ८० क्सुवर्ण पदकं आणि ९ पीएचडी पदव्या देण्यात आल्या. ॲमेटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ आहे.