Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ए मेथड इन मल्टीशेड’: भारतीय कलात्मक सिनेमा क्षेत्रातील गौरव ठाकूर या उगवत्या तार्‍याचा नवा कलाविष्कार पहा

गौरवास्पद! भारतातील मोजक्या कलात्मक सिने-दिग्दर्शकांच्या यादीत जोडलं गेलं आणखी एक मराठी नाव

भारतीय चित्रपट सृष्टीत कलात्मक सिनेमांचं(Art Films) एक आगळं-वेगळं स्थान आहे. या चित्रपटांचे देशविदेशात करोडो चाहते आहेत. मागील दशकापासून तर मुख्य प्रवाहातील मसालेपट पाहणारा सिनेरसिकही या चित्रपटांकडे वळू लागला आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हटलं की त्यात प्रामुख्याने सत्यजित रे, श्याम बेनेगल, केतन मेहता, विजया मेहता, जब्बार पटेल ते नव्या पिढीच्या नागेश कुकुनूर, जानु बरूआ, आनंद गांधी, अनुराग कश्यप आदी दिग्दर्शकांची नावं आपल्यासमोर पटकन येतात. याच पठडीत आता आणखी एक मराठी तरुणाचं नाव जोडलं गेलंय. पनवेल-नवी मुंबईतील २८ वर्षीय सिने-दिग्दर्शक गौरव हृषिकेश ठाकूर याने लिओनोव्ह प्रॉडक्शन सोबत ‘ए मेथड इन मल्टीशेड ‘A Method in Multishade’ या हिन्दी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दीड तासांच्या या चित्रपटाची कथा व पटकथा ही कला चित्रपटांच्या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरू शकेल अशीच आहे. गौरव ठाकूर Director Gaurav Thakur याने दिग्दर्शनासोबत ही जबाबदारीही सक्षमपणे पेलली आहे. मिथुन रामधरणे व आकांक्षा मुंढे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका सकारली असून पदार्पणातच दोघांनी आपल्या अंगभूत अभिनय कौशल्याची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे सक्षम छायाचित्रण. साईराज बटाले या नव्या दमाच्या सिनेमॅटोग्राफरने हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. या चित्रपटातील कलाकार हे प्रामुख्याने पनवेल व नवी मुंबई परिसरातील असून ५५ जणांच्या या चमुसोबत जवळपास १५ तंत्रज्ञांना एकत्र घेत २८ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. पॅनोरोमा स्टुडिओज या चित्रपट वितरण क्षेत्रातील नामांकित कंपनीने चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. २० डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट गूगल प्ले, आय ट्यून्स व अॅपल टीव्ही या ओटिटी प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून जगभर प्रदर्शित करण्यात आला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पदार्पणाच्या एका आठवड्यातच गूगल प्ले वर नवीन चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट दुसर्‍या स्थानीही पोहोचला.

गौरव ठाकूर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने या आधी जवळपास २१ लघुपट(Short films) तयार केले असून नवी मुंबईतील लोकमान्य टिळक कॉलेज मधून मास मीडिया चे शिक्षण पूर्ण केले आहे. “बालपणापासून चित्रपट क्षेत्रातचे वेड माझ्या नसानसांत भिनलेले होते. त्याला योग्यरित्या वाट मोकळी करून देण्यामध्ये महत्वाचा पाया रचला तो माझ्या आई-वडिलांनी. आणि पुढे यावर कळस चढवण्यात वेळोवेळी योगदान दिले ते माझ्या मित्रपरिवार कम टीम ने” असे गौरव आवर्जून म्हणतो.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *