मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड ला स्थगिती दिल्यानंतर आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या कारशेड चे समर्थक माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी यावर तात्काळ प्रतिक्रिया देत नवीन सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, “मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच !
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते.
अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील.”
