महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याबाबत राष्ट्रपतींकडे शिफारस : सरकारी वृत्त वाहिनी
मुंबई: महाराष्ट्रातल्या सत्तासमीकरणांची गणितं आता वेगळ्या वळणावर आलेली दिसत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रात्री ८:३० वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणे बंधनकारक आहे. आज ठरलेल्या वेळेत राष्ट्रवादी ने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते याबाबतचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवला असल्याचे वृत्त थोड्या वेळापूर्वी केंद्र सरकारच्या आखात्यारीत येणाऱ्या दूरदर्शन न्युज चॅनेल ने सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित केले आहे.
आज जर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर राज्यातील सर्व सूत्र दिल्लीवरून हाताळली जातील आणि याचे चांगले तसेच वाईट परिणामही भोगावे लागू शकतात. राज्यात सध्या काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळामुळे शेतकरी हवलादिल झाला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा वेळेत न सुटल्यामुळे बळीराजावर अस्मानी सोबत शासनी संकट ओढावलंय यात शंका नाही. पण ही परिस्थिती ओढवली त्याला सद्यस्थितीत राजकीय पक्षच जबाबदार आहेत असे म्हणणे अतिशयोक्त पूर्ण ठरू नये.
