‘आरबीआय’ कडून पीएमसी बँकेच्या खातेधारकांना १०००० रुपये काढण्याची मुभा
मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत यामुळे सर्व खातेदारांचे धाबे दणाणले असून त्यात फक्त एक हजार रुपये पर्यंतच पैसे काढण्याची मुभा आरबीआयकडून घालण्यात आली होती. त्यामुळे तर सामान्य खातेधारक आणखीनच रडकुंडीला आले होते पण थोड्याच वेळापूर्वी आरबीआयने खात्यामधून १०,००० हजार रुपये काढण्याची मुभा देत सर्वांना काहीसा दिलासा दिला आहे. आज पीएमसी बँकेच्या अनेक खातेदारांनी बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळा विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. यासोबत त्यांनी संचालक मंडळाचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे.
