ठाकरेंच्या वाघिणीने मुख्यमंत्री फडणवीसांचा घेतला समाचार
मुंबई, दि. १९: काल परवा मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला ज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने बाजी मारत ११८ जागा पटकावल्या. दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीला ७१ जागांवर समाधान मानावं लागलं तर कॉंग्रेसच्या पारड्यात २४ जागा पडल्या. या निवडणुकीत युतीतर्फे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी फक्त तीन सभा घेत आपला करिष्मा दाखवला. निकालानंतर आता प्रतीक्षा लागून राहिली आहे ती मुंबईचा महापौर कोण होणार? तो शिंदेंचा होणार, मराठी होणार कि अमराठी होणार यावर सध्या माध्यमांत चर्चा चालू आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स वर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खिजवलं आहे. आपल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात कि, “फडणवीस चाणक्य असते तर आतापर्यंत महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून टाकला असता पण ते तसे करू शकत नाहीत. कारण फडणवीसांना अजूनही एकहाती शतक मुंबईत गाठता आलं नाही. ही अश्वत्थाम्याची न भरणारी जखम आहे. ८४ ची संख्या फक्त पाच ने वाढली. पण त्यातही ३५ बाहेरून आलेले आहेत. ३७ अमराठी आहेत. आणि जे दहा-बारा आहेत ते आमदार खासदारांचे नात्यागोत्यातले आहेत. फडणवीसांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या असुरी सत्ताकांक्षासाठी ठाकरेंना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंचे पक्ष, चिन्ह, ज्यांना घडवलं ते आमदार, खासदार, नगरसेवक सगळं गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेत ९ खासदार, विधानसभेत २० आमदार, मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवक निवडून आणलेत. ठाकरेंनी मैदान सोडलं नाही. ठाकरे कुठेही ईडीसीबीआय इलेक्शन कमिशन च्या मागे लपले नाही. ठाकरेंनी कुणाचेही उमेदवार विकत घेतले नाही. ठाकरे निधड्या छातीने लढले..!”
