शिवसेनेचे सुनील शिंदे ठरले सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार
आपण निवडून दिलेल्या आमदारांचं मेरीट कोण काढून देऊ शकतो? हा प्रश्न तसा सर्व मतदारांना पडत असतो. पण यावर उत्तर शोधणाऱ्या प्रजा फाऊंडेशन सारख्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, ज्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा हिशोब ठेवतात.
प्रजा फाऊंडेशन तर्फे मुंबईतील आमदारांचा सर्वे करण्यात आला आहे. यात शिवसेनेचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार ठरले आहेत. त्या खालोखाल दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे अनुक्रमे काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमिन अमिर अली पटेल आणि मालाडचे आमदार अस्लम रमजान अली शेख यांनी. मुंबईतील एकूण ३२ आमदारांचा सर्वे करताना त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. यातून सर्वात धक्कादायक गोष्ट बाहेर पडली ती म्हणजे गेल्या पाच वर्षात घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभेत मतदारसंघातला एकही प्रश्न विचारलेला नाही. त्यांनी ३१वा क्रमांक पटकावला आहे. या सर्वात शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारल्याचे दिसत आहे, तर राज्यात सर्वात जास्त आमदार असणाऱ्या भाजपच्या आमदारांची कामगिरी खालावली दिसतेय.
Insights from Praja’s #Mumbai MLA Report Card: Here are the top three performers for 2019. Read more about the performance of your #MLA: https://t.co/8Gz17D4Rrw pic.twitter.com/2QhkJ6lBxD
— Praja Foundation (@Prajafoundation) August 29, 2019
