…… ‘या’ दहा सरकारी बँकांचं होणार आहे विलीनीकरण
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेऊन बराच काळ लोटला. गेल्यावर्षी विजया बँक आणि देना बँक या दोन सरकारी बँकांचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये करण्यात आलं होतं. त्या पुढचा टप्पा म्हणून काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील दहा बँकांचे विलीनीकरण केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
१) कॅनरा बँक + २) सिंडिकेट बँक
३) युनियन बँक + ४) आंध्रा बँक + ५) कॉर्पोरेशन बँक
६) इंडियन बँक + ७) अलाहाबाद बँक
८) पंजाब नॅशनल बँक + ९) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स + १०) युनायटेड बँक
