राज्यात सरासरीच्या ११७ टक्के पाऊस; सांगलीत सर्वाधिक १७० टक्के पाऊस
मुंबई/पुणे, दि. २९: यंदाच्या वर्षी चक्क मे महिन्यातच पावसाचं आगमन झालं. यानंतर मध्ये मध्ये काही दिवसांचा अपवाद वगळता पावसाने आपली फलंदाजी निरंतर चालूच ठेवली. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
Source – AIR
