काश्मीर खोऱ्यातली ४८ पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय
जम्मू आणि काश्मीर, दि. २९: पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातली ४८ पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू कश्मीर सरकारने घेतला आहे. गेल्या मंगळवारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात देशभरातून आलेले २५ पर्यटक व १ स्थनिक घोडेस्वाराचा बळी गेला. यानंतर काश्मीर मधून पर्यटक आपापल्या राज्यात परतायला सुरुवात झाली. पहेलगाम ह्ल्ल्यानंतर काश्मीरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. श्रीनगर विमानतळावरची प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे. खोऱ्यात एकूण ८७ पर्यटनस्थळं आहेत. इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
Source – AIR
