आरोग्य: जाणून घ्या का ताप, सर्दी, खोकला असताना फळांचा रस पिऊ नये
आयुर्वेद कुतूहल : स्वरस (Juice)
आयुर्वेदामध्ये पंचविध कषाय मध्ये स्वरस म्हणजेच Juice चा उल्लेख आहे. हि सर्वात प्रथम कल्पना असून आयुर्वेदानुसार ती पचायला अत्यंत जड आहे. म्हणूनच व्यक्तीच्या पचन शक्तीच्या आधारे त्याला स्वरस द्यायचा कि नाही हे कळते, तसेच त्याची एका वेळी सेवन करायची मात्रा हि आता आपण जे रस पितो त्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
त्याचप्रमाणे स्वरस हा नेहमी ताजा प्यावा, त्याची Shelf Life म्हणजे सवीर्यता अवधी हा जास्तीत जास्त 8 ते 10 तास असते, काहींचा रस तर तंबोडतोब प्यावा लागतो.
वरील तीन मुद्यांवरून आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येते की आपल्या पाचन शक्तीचा, मात्रेचा म्हणजे juice एका वेळेस किती प्यावा व तो किती काळ जुना आहे ह्या सर्वांचा विचार रस Juice पिताना जरूर केला पाहिजे.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक औषधांचे, फळांचे रस पॅक बंद केलेले मिळतात व आपण ते आवडीने आपल्या हेल्थ साठी पितो देखील परंतु हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार आपण अवश्य करायला हवा.
स्वरस (juice) पिताना खालील बाबींचा विचार अवश्य करावा
१) रस नेहमी ताजा आणि त्याची मात्रा हि कमीच असावी
२) स्वरस juice हे पचायला जड असतात म्हणून पचनाचे विकार असणाऱ्यानी सहसा सेवन करू नये.
३) नुकतेच तापातून उठलेले रुग्ण, ताप असताना, सर्दी, खोकला, आमवात असताना देखील स्वरस पिऊ नये, कोणत्याही रुग्णाने ज्याची पचनशक्ती कमी आहे त्याने स्वरस पिताना विचार करावा.
४) मलावरोध, अर्श, भगंदर हे विकार पाचनशक्ती कमी असल्यामुळेच निर्माण होतात त्यामुळे ह्या स्थितीत हि स्वरस पिणे टाळावे.
५) स्थूल व्यक्तीने देखील स्वरस घेणे टाळावे.
मी फळांच्या विरोधात नाही तसेच ज्युस च्या हि विरोधात नाही परंतु पाचन शक्तीच्या आधारे त्याचे सेवन व्हावे एवढेच, फळे रस करून घेण्या ऐवजी ती अखंड खाणे कधीही चांगले.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center
फोटो सौजन्य : sukhadia.com and Plantogram
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)
