Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कर्नाटकातील नाट्यावर अखेर पडदा, बी. एस. येडीयुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत

कर्नाटकातील नाट्यावर अखेर पडदा, बी. एस. येडीयुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत

कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला. भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्रीपद सुरक्षित केले.

कर्नाटक विधानसभेत एकूण २२५ आमदार असून त्यातल्या १७ आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अपात्र घोषित केले होते. ज्यात १३ काँग्रेसच्या, ३ जीडीएस व एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे. आज एकूण उरलेल्या २०७ आमदारांपैकी १०६ आमदारांनी भाजपच्या बाजूने तर ९९ आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मत दिलं. शुक्रवारी सायंकाळी चौथ्यांदा बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपने आज मिळवलेला विजय काँग्रेससाठी फार धक्कादायक गोष्ट मानली जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *