मुंबई, कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर असाच कायम राहणार
मुंबई: मुंबईत या वर्षी मॉन्सूनचं आगमन भलेही उशिराने झालं परंतु आगमनाच्या दोन दिवसातच इथल्या भागाला झोडपून काढलं आहे. काल तर पावसाने उसंतच घेतली नाही. मुंबईत काल २८ जून ला सकाळी ८:३० वाजल्यापासून गेल्या २१ तासाच्या दरम्यान २१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अजूनही पावसाचा जोर पाहायला मिळत नाही.
स्कायमेट या खाजगी हवामान अनुमान संस्थेच्या हवामान तज्ज्ञांनुसार, पश्चिम किनाऱ्यावरील भागावर बनलेली एक ‘ट्रफ’ रेषा तसेच मध्य-पूर्व अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळी वातावरणामुळे मान्सून सक्रिय झाला आहे आणि याचमुळे मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरात, कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
पुढच्या २४ तासात पाऊस थांबण्याची कुठलीच चिन्ह नाहीत. आज शनिवार २९ जून रोजी तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
