Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खासदार उदयनराजे भोसलेंनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांचे मानले आभार म्हणाले …..

खासदार उदयनराजे भोसलेंनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांचे मानले आभार म्हणाले …..

सातारा: राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. या बाबत त्यांनी एक ट्विटर द्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे.

उदयनराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, “सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा. आरक्षणाच्या लढ्यात ५० पेक्षा जास्त तरुणांचं बलिदान झालं हे आरक्षण त्यांना खरी श्रद्धांजली असेल. माननीय उच्च न्यायालयाने मराठा समाजाची बाजू ऐकून त्यांना न्याय दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड याचे आभार मानताना ते म्हणाले राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री.एम. जी गायकवाड यांनी केलेल्या सर्वेक्षणातुन मराठा समाजाचा खरा चेहरा न्यायालयात व राज्यसरकार ला दाखवला यासाठी त्यांचे मराठा समाजातर्फे जाहीर आभार.

काल कोर्टात निकाल देण्याची प्रक्रिया चालू असताना त्यांनी मराठा आरक्षणाची केस कोर्टात लढवणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांना पुनः एकवार पाठिंबा जाहीर केला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *