पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याला उद्यापासून होणार सुरुवात; १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ ठिकाणी घेणार सभा
नाशिक, दि. ०७: विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. उद्यापासून ते १४ नोव्हेंबर पर्यंत मोदींच्या सभा धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं होणार आहेत.
या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उद्या धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं प्रधानमंत्री प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सभेच्या काळात या भागात विनापरवाना ड्रोन उडवायला प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Source – AIR
