“राज्याची सध्याची स्थिती गंभीर; सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही” – शरद पवार
बारामती, दि. 2: राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते आज गोविंद बाग, बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.
राज्यात परिवर्तन आणण्याचा आणि राज्याच्या नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याचा निर्धार आज पाडव्याच्या दिवशी करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतचा निष्कर्ष गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप पवार यांनी केला.
राज्यात जनहितासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठीचा निधी सरकारनं गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये दुसरीकडे वळवल्यानं लाभार्थ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
Source – AIR
संग्रहित छायाचित्र
