बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. या वर्षी बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती सर्वांना दिली.
या वर्षी परीक्षेला जवळपास १४ लाख २१ हजार ९३६ इतके विद्यार्थी बसले होते यातील एकूण १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९०.२५ टक्के तर मुलांचा निकाल ८२.४० टक्के इतका आहे. या वर्षी उत्तीर्ण मुलींच्या निकलातील टक्केवारी ७.८५ टक्क्याने वाढली आहे.
एकूण ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
यंदाही कोकण विभागाने विभागनिहाय निकलांमध्ये बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त ९३.२३ टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८२.८१ टक्के इतका लागला आहे.
शाखानिहाय निकाल
विज्ञान – ९२.६० टक्के
वाणिज्य – ८८.२८ टक्के
कला – ७६.४५ टक्के
विभागनिहाय निकाल
कोकण – ९३.२३ टक्के
पुणे – ८७.८८ टक्के
औरंगाबाद – ८७.२९ टक्के
कोल्हापूर – ८७.१२ टक्के
अमरावती – ८७ टक्के
लातूर – ८६.०८ टक्के
नाशिक – ८४.७७ टक्के
मुंबई – ८३.८५ टक्के
नागपूर – ८२.८१ टक्के
