Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुक लढवणार ?

Aaditya Thackeray

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुक लढवणार ?

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत प्रचारामध्ये आघाडी घेत महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावला होता. आधीपासून शहरी भागातील तरुणाईला त्यांच्याबद्दल एक विशेष आकर्षण राहिलंय. साधा-सालस चेहरा, डोळ्यात नम्रता, वाणी सौम्य पण भाषणात मुद्देसूद मांडणी ही वैशिष्ट्ये राहिलेल्या आदित्य कडे या निवडणुकांत ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणाईही आकर्षित झाली.

यामुळेच असेल म्हणा पण युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आता आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी म्हणून अप्रत्यक्ष गळ घातली जात आहे. त्यांचं झालं असं की युवासेनेचे एक पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात आदित्य ठाकरें बरोबर गळाभेटिचा एक फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि सोबत खाली काही सूचक ओळी लिहिल्या आहेत.
ते यात म्हणतात “हिच वेळ आहे..हीच संधी आहे… लक्ष्य – विधानसभा २०१९ !!
महाराष्ट्र वाट पाहतोय …”

https://www.instagram.com/p/Bx4APS7BFFv/?igshid=12br2jzov28a

याआधीही शिवसैनिकांकडून विशेषतः युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी या बाबत मागणी करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आदित्य यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा दिली होती. आता येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षतर्फे थेट निवडणूक लढवत आदित्य कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची ही मागणी मनावर घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *