मी पक्षाच्या वरिष्ठ लोकांना आलिंगन देतो, कारण ते अनुभवी आहेत : राहुल गांधी
सोलन, हिमाचल प्रदेश: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातला प्रचाराचा ज्वर आता जरा जास्तच वाढायला लागला आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश मधील सोलन येथे आज प्रचारसभेत पुनः एकदा नोटबंदी या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, “काँग्रेस पक्षाची लोकं चुकांमधून शिकतात. मोदीजी चुकांमधून शिकणं तर दूर, चूक ओळखतंच नाहीत. संपूर्ण देश नोटबंदीला चूक मानत आहे, परंतू मोदींनी हे वास्तव स्वीकारलंच नाही.”
तसेच मोदींनी मागील लोकसभा निवडणुकांमध्ये दिलेल्या अश्वासनांबाबत बोलताना ते म्हणाले की मोदींनी जी आश्वासनं गेल्या वेळी दिली होती, त्याबाबत ते बोलुही शकत नाहीत. कारण काम झालंच नाही.
वायुसेने बाबत मोदींनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांची खिल्ली उडवत राहुल म्हणाले की, “मोदीजी म्हणतात की त्यांनी वायुसेनेच्या लोकांना समजावलं. म्हणजे ज्या लोकांकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, त्यांना मोदी समजावत आहेत? समाजात नाही कोणत्या जगात ते राहत आहेत.”
राहुल गांधी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
# मी पक्षाच्या वरिष्ठ लोकांना आलिंगन देतो, कारण ते अनुभवी आहेत, त्यांच्यापाशी ज्ञान आहे. आणि इथे मोदीजी आपले गुरु अडवाणींकडे ढुंकूनही पाहत नाहीत, पाठ करून उभे राहतात. आपल्याला अनुभवाने शिकायला पाहिजे.
# पुलवामा येथे जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही म्हणालो की सरकार, सेना आणि देशाला आमचं १०० टक्के समर्थन आहे. पण एका बाजूला पाहिलं तर मुंबई हल्ल्याच्या वेळी मोदी पत्रकार परिषद घेत होते आणि या प्रकरणी राजकारण करत होते.
#”न्याय योजनेचा फायदा छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक, बेरोजगार, शेतकऱ्यांना होईल. ही योजना भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करेल.
# आम्ही आमच्या जाहीरनाम्यात जे लिहितो, ते करून दाखवतो. आम्ही मनरेगा योजनेबाबत लिहिलं होतं, ती केली; कर्जमाफीचा उल्लेख केला होता, तीही केली.
