Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दूरसंवाद विभागाने पुढच्या आवृत्तीतील वायरलेस तंत्रज्ञानामधील नवीन उपक्रम आणि सहयोगासाठी भारत 6 जी अलायन्सचे केले उद्घाटन

दूरसंचार विभागाद्वारे ७५ हून अधिक नवोन्मेशीचा केला सत्कार

नवी दिल्‍ली/मुंबई, दि. ४: दूरसंचार क्षेत्र हे नवनव्या तंत्रज्ञानासह सातत्याने विकसित होत असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्राने वायर लाईन ते मोबाइल सेवा असा कायापालट पाहिलेला आहे. मोबाइल सेवा आता लोकांची जीवनरेखा झाली आहे. मोबाइल सेवेने तर 2 जी ते 3 जी ते 4 जी ते 5 जी आणि आताचे 6 जी असे परिवर्तन बघितले आहे.

सार्वत्रिक आणि माफक दरात कनेक्टिव्हिटी, स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे, दूरसंचार आणि सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेचा विकास करणे, 6 जी तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेणे या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी आज रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दळणवळण राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भारत 6 जी अलायन्सच्या उद्घाटनाची घोषणा केली,

  • भारत 6 जी अलायन्स (बी 6 जीए) ची निर्मिती, सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानक विकास संस्थांचा समावेश असलेले  हे एक सहयोगी व्यासपीठ आहे.
  • भारत 6 जी अलायन्सच्या https://bharat6galliance.com या संकेतस्थळाचे अनावरण
  • बी 6 जीए इतर 6 जी जागतिक आघाड्यांशी  युती आणि समन्वय निर्माण करेल, आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवेल

याव्यतिरिक्त, प्रकल्पांसाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (टीटीडीएफ) अंतर्गत २४०.५१ कोटी अनुदानासह, दोन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

  • ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम (ओएएम) सह 6जी टेरा हर्झट टेस्टबेड आणि समीर, आयआयटी मद्रास, आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी पटना यांच्या गटाद्वारे (कन्सोर्टियम) मल्टीप्लेक्सिंग
  • आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) दिल्ली, सिग्नलचीप इनोव्हेशन्स, सिग्नलट्रॉन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, सॅसमॉस हेट टेक्नॉलॉजिज लिमिटेड, एसएफओ टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट. या कन्सोर्टियम सदस्यांसह अॅडव्हान्स ऑप्टिकल कम्युनिकेशन टेस्ट बेड लिमिटेड, इआरनेट इंडिया, क्वानफ्लुएन्स प्रायव्हेट लिमिटेड, स्टरलाईट टेक्नॉलॉजिज लिमिटेड, नाव टेक, तेजस नेटवर्क.

डीसीआयएस (डिजिटल कम्युनिकेशन इनोव्हेशन स्क्वेअर) अंतर्गत,

  • 66 स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना (एमएसएमई) 48 कोटी रूपयांच्या अनुदानाची घोषणाही करण्यात आली.
  • 75 इनोव्हेटर्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय योगदान आणि समर्पणाबद्दल दूरसंचार विभागाकडून सन्मानित करण्यात आले. डीसीआयएस योजनेंतर्गत दूरसंचार विभाग अशा स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना निधी देत आहे.
  • डीसीआयएस चे तपशील https://dcis.dot.gov.in/ वर उपलब्ध आहेत

जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान उज्ज्वल आहे आणि भारतात दूरसंचार क्षेत्राचे स्थान सर्वात उज्ज्वल आहे असे मत चौहान यांनी व्यक्त केले. हे स्थान मिळवण्यासाठी सर्व भागधारकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत दूरसंचार क्षेत्रासाठी संरचनात्मक, प्रक्रियात्मक अशा विविध सुधारणा आणि उपाययोजना राबवल्यामुळे या क्षेत्राचे सनराईझ क्षेत्रात स्थित्यंतर झाल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या ज्या मार्गाचा भारत अवलंब करत आहे तो मार्ग जग आत्मसात करत असल्याचे ते पुढे म्हणाले,

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या फलस्वरूप भारत आणि अमेरिका एकत्रितपणे तंत्रज्ञान तयार करतील आणि हे बदल विकसित भारतासाठी उपयुक्त ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारताला 6जी तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये अग्रेसर बनवण्यासाठी भारत 6जी अलायन्स मदत करेल यावर त्यांनी भर दिला.

पार्श्वभूमी

भारत 6 जी अलायन्स (बी 6 जीए) बद्दल

6जी च्या व्यवसाय आणि सामाजिक गरजा तंत्रज्ञानाच्या गरजांपलीकडे जाऊन समजून घेणे, या गरजांवर एकमत निर्माण करणे आणि उच्च-प्रभावी मुक्त संशोधन आणि विकास उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे बी 6 जीए चे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

भारतीय स्टार्टअप्स, कंपन्या आणि उत्पादन क्षेत्र परिसंस्था यांना एकत्र आणण्यासाठी भारतातील 6 जी तंत्रज्ञानाची रचना, विकास आणि उपयोजन करणारा गट तयार करणे हेही बी 6 जीएचे एक उद्दिष्ट आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *