Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

श्रुती घोगळे(Shruti Ghogale) इन ऍक्शन; विक्रोळी विभागात सामाजिक उपक्रमांचा लावलाय धडाका

पती विनोद घोगळे (Vinod Ghogale) यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत परिसर केला सॅनिटाईझ

विक्रोळी, दि. १: गतवर्षी याच काळात कोविड-19 चा प्रादुर्भाव देशात व राज्यात सुरू झाला व सगळीकडे या विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबत सामाजिक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मैदानात उतरले होते.

गेल्या काही दिवसांपासून कोविड चा उतरता आलेख अचानक वर जायला सुरुवात झाली आणि सर्वांच्या काळजात पुन्हा धडकी भरायला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विक्रोळी परिसरातील विनोद(साई) घोगळे Vinod (Sai) Ghogale यांनी गतवर्षी जशी सॅनिटायझेशन ची मोहीम हाती घेतली होती तशाच स्वरूपाची एक मोहीम समाजसेविका व भाजप कार्यकर्त्या श्रुती घोगळे(Shruti Ghogale) यांनी हाती घेतली आहे.

श्रुती घोगळे(Shruti Ghogale) यांनीही पती विनोद घोगळे(Vinod Ghogale) यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून विक्रोळी परिसरात सॅनियझेशन करण्यास सुरुवात केली आहे. श्रुती घोगळे विक्रोळी प्रभाग क्र. ११९ मधून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक भाजपच्या तिकिटावर लढवण्यास इच्छुक असल्याचे कळते. त्याच पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची व्यूहरचना श्रुती घोगळे यांनी आखली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार व माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मुलुंड येथे भाजप महिला मोर्चा तर्फे आयोजित आंदोलनातही श्रुती घोगळे(Shruti Ghogale) यांचा प्रमुख सहभाग होता.

त्यांचे पती विनोद घोगळे(Vinod Ghogale) हे भाजपप्रणीत माथाडी युनियन च्या राज्य उपाध्यक्षपदी असून खासदार मनोज कोटक व भाजप नेते आशिष शेलार यांचे निकटवर्तीय मानले जातात. प्रभाग ११९ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मोडतो. येथे शिवसेनेचे प्राबल्य असून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे येथील विद्यमान आमदार आहेत. या प्रभागात सध्या त्यांना थेट आव्हान देण्याची हिम्मत घोगळे परिवार सोडल्यास कोणीच करताना दिसत नाहीये.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *