वंचित बहुजन आघाडी जिंकणार ४८ जागा; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत
वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलखती दरम्यान एक विधान करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. वंचित आघाडी महाराष्ट्रातील सर्वच्या-सर्व ४८ जागा जिंकेल असं म्हणत एगझिट पोल दयायचे होते त्यांनी दिले, ते आकडे खरे की खोटे हे निकालानंतर स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. २०१४ च्या काळातल्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने उच्चांक गाठला होता, त्यामुळे सामान्य माणसाला काँग्रेस बद्दल चीड होती. ती चीड मतात परिवर्तित होऊन भाजपचा विजय झाल्याचे ते म्हणाले.
ईव्हीएम हॅक होऊ शकण्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आरोपांबाबत ते म्हणाले की, “ईव्हीएम हॅक करणं कठीण नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक आयटम हॅक होऊ शकतो. हॅक कसं होतं हे फक्त शिकलं पाहिजे. असं कोणतंही यंत्र नाही ज्याचं हॅकिंग होऊ शकत नाही”
जवळपास महत्वाच्या सर्वच एग्झित पोल्स मध्ये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे म्हणा हवे तर पण अॅड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
