Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर आज करणार शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर आज करणार शिवसेनेत प्रवेश

बीड: राष्ट्रवादी काँग्रेस चे बीडमधील बडे नेते जयदत्त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून क्षीरसागर हे राष्ट्रवादीतील अंतर्गत गतबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याचे मानले जात होते.

बीड जिल्ह्यात गेले ४० वर्ष क्षीरसागर घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच त्यावेळी क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाजपच्या प्रीतम मुंडे यांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हा पासूनच त्यांच्या शिवसेना प्रवेशाची अटकळ होती.
आघाडी शासनाच्या काळात मंत्रिपद भूषविलेले जयदत्त क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा संघांवर पकड आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीची मोठी ताकत जिल्ह्यातून नाहीशी होणार असल्याचे मानले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *