Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ‘द्रोणागिरी युवा २०२१ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्रदान

उरण दि. ४(विठ्ठल ममताबादे): द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या नामांकित संस्थेतर्फे दरवर्षी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. याही वर्षी रायगड जिल्हास्तरीय २० व्या द्रोणागिरी युवा महोत्सव २०२१ चे आयोजन ३ मार्च ते ७ मार्च २०२१ दरम्यान एनएमएसई झेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ, बोकडवीरा, तालुका उरण, जिल्हा – रायगड येथे करण्यात आले असून दि. ३ रोजी या महोत्सवाचे उदघाटन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

दुपारी ४ वाजता द्रोणागिरी देवी (करंजा) येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वल करून ती क्रीडा ज्योत युवा महोत्सवाच्या क्रीडा संकुलात आणण्यात आले. लगेचच ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आर. सी. घरत, महेंद्र घरत, रवी पाटील, मिलिंद पाडगावकर, डॉ. मनिष पाटील, द्रोणागिरी असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत इतर मान्यवर असोसिएशन सदस्य व खेळाडू सोशल, फिजिकल डीस्टन्स नियमानुसार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवा महोत्सवाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरण आयोजित २० वा युवा महोत्सव प्रसंगी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना द्रोणागिरी भूषण पुरस्कार देण्यात आले. यामध्ये

किरण मढवी (उलवे) – सामाजिक क्षेत्र,
विद्याधर पाटील (उरण) – शैक्षणिक क्षेत्र,
सुदेश पाटील (कोप्रोली) – सामाजिक क्षेत्र
गणेश मोकल (जसखार) – शैक्षणिक क्षेत्र,
दिगंबर पाटील (उलवे) शैक्षणिक क्रीडा क्षेत्र
प्रज्ञेश म्हात्रे (पेण) – शास्त्रज्ञ,
तुषार म्हात्रे (पिरकोन) – शैक्षणिक
देवेंद्र पाटील (पनवेल) – शैक्षणिक,
रुद्राक्षी टेमकर (उरण) – क्रीडा
संजय होळकर (मोठी जुई) – शैक्षणिक,
सायली कोळी (करंजा) – वैमानिक,
संतोष बहिरा (पनवेल) – योगा क्षेत्र
विकास कडू (उरण) – सामाजिक क्षेत्र

यांना मान्यवरांच्या हस्ते द्रोणागिरी पुरस्कार देण्यात आले. तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता जनतेचा, समाजाचा व्यापक हिताचा विचार करून घरोघरी फिरून कोरोना विषयक जनजागृती करणारे व कोरोना काळात गोरगरिबांना सेवा सुविधा पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना योद्धा म्हणून

माजी आमदार मनोहरशेठ भोईर,
रमाकांत म्हात्रे (रांजणपाडा),
संतोष पवार (उरण),
राजू मुंबईकर (वेश्वी ),
रविशेठ पाटील (वहाळ साई मंदिर ),
हसुराम पाटील (रांजणपाडा ),
मच्छिन्द्र म्हात्रे (वशेणी ),
भूषण पाटील – (JNPT विश्वस्त),
गणेश शिंदे (उरण ),
माधव सिद्धेश्वरे (उरण),
बालाजी हेड्डे (उरण),
नरेश म्हात्रे (गोवठणे),
मिलिंद खारपाटील(चिरनेर),
मनोज पाटील (सारडे) यांचा कोविड १९ कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून करण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व उमेदवारांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकंदरीत द्रोणागिरी महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *