Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील ४ स्टार्ट-अप्स युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग २०२२ मध्ये ठरले विजयी;

९ राज्यांमधील एकूण बारा स्टार्ट-अप विजेते

नवी दिल्‍ली/मुंबई, दि. २८: युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग २०२२ मध्ये महाराष्ट्रातील चार स्टार्ट अप्स विजयी  झाले असून, देशातल्या नऊ राज्यांमधील एकूण १२ स्टार्ट अप्स विजेते ठरले आहेत. युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडियाच्या ५व्या आवृत्तीत सहा थीम्स- कृषी, शिक्षण-तंत्रज्ञान, महिलांसाठी उपजीविका, चक्राकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधता या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील ९ राज्यांमधील बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित करण्यात आले. अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), चे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव; यूएनडीपी इंडियाच्या निवासी प्रतिनिधी शोको नोडा आणि अभिनेत्री आणि यूएनडीपी चॅम्पियन संजना संघी  यांनी विजेत्यांना सन्मानित केले. विजेत्या १२ स्टार्ट-अप्स संस्थांना त्यांच्या नवकल्पना वाढवण्यासाठी $५,००० पर्यंत सीड फंडिंग प्राप्त होणार.

युथ को:लॅब

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि सिटी फाउंडेशन द्वारा २०१७ मध्ये संयुक्तपणे निर्मित यूथ को: लॅबचा उद्देश युवकांना  सशक्त बनवणे आणि त्यांच्यात गुंतवणूक करण्याच्या उद्दिष्टाने, आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार केले असून, ज्यामुळे नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती येऊ शकेल. भारतात २०१९ मध्ये अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीति आयोग यांच्या भागीदारीतून युथ को:लॅबचा प्रारंभ झाला. २०२२-२३ आवृत्तीसाठी देशभरातील २८ राज्यांमधून एकूण ३७८ अर्ज प्राप्त झाले होते.

बारा स्टार्ट-अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ४ स्टार्ट-अप्सचा समावेश आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी संधी निर्माण करणारे पुणे स्थित संस्थापक आकाशदीप बन्सल यांचे सरल एक्स (SaralX), महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारा मुंबईतील संस्थापक सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला (Project Baala), महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण संबंधी उपाय सुचवणारा संस्थापक अक्षय दीपक कावळे यांचा ऍग्रोशुअर (Agrosure) आणि कमी कार्बनच्या  शाश्वत पर्यायांवर खर्च करण्यास प्रोत्साहन देणारा संस्थापक रजत सोहन विश्वकर्मा यांचा मुंबईतील मायप्लॅन ८ (Myplan 8) यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *