तिन्ही पक्षांचे एकमत आहे. पाच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल : शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई: काल दिल्लीत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शिर्षस्थ नेत्यांच्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपकडून सत्तास्थापनेबाबत आलेल्या तथाकथित प्रस्तावाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, “कोण बडा नेता? कोणती ऑफर? कुणी अशी काही ऑफर दिली असेल तर आता वेळ संपली आहे. त्यांनी जो सेल लावला होता तो संपला आहे. शिवसेनेने अत्यंत स्वाभिमानाने निर्णय घेतला असून पुढील पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी ते शिवसेनेला नको आहे.”
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
१) आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व तयार होत आहे, पण आघाडीचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांनीच करावं अशी सर्वांची इच्छा आहे.
२) आज तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बैठक करणार आहेत. ३) उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत हिच इच्छा आहे.
४) मी फक्त शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे.
५) आम्हाला कुणाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
६) शिवसेनेने स्वाभिमानाने निर्णय घेतला आहे, आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी ते शिवसेनेला नको.
७) कुणी ऑफर दिली असेल तर आता वेळ संपली आहे, त्यांनी कुणी जो सेल लावला होता तो संपला आहे.
८) सर्व जनतेची इच्छा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत.
महाराष्ट्राला मजबूत कणखर नेतृत्त्व मिळेल.
९) तिन्ही पक्षांचे एकमत आहे. पाच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. दोन दिवसांत निर्णय कळेल
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार.
