मुंबई पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेत निवडून आल्या शिवसेनेच्या महिला महापौर
उल्हासनगर: मुंबई पाठोपाठ आज उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका लीलाबाई आशान यांची महापौरपदी निवड झाली. गेल्या वेळी येथे भाजपने शिवसेनेला बाजूला सारत आपला महापौर बसवला होता. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्याने शिवसेनेने महापौर पदी आपला उमेदवार विराजमान केला.