‘भाड में गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता’, संजय राऊतांची जीभ घसरली
मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दुसरा टप्पा जस जसा जवळ येत आहे तस तसे निवडणूकीतील वातावरणदेखील चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अनेक नेत्यांची जीभ घसरताना आपण बघितली आहे. मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल ढासळला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान केलं आहे. कानून आमच्यासाठी बनवण्यात आला नाही. आम्ही हवा तेव्हा कानून बदलू शकतो. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आलं की श्वास कोंडल्यासारखं होतं, असे म्हणत भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता असे राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यात आचारसंहिता असतानाही राऊत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
