Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज ४६ वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याविषयी

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज ४६ वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याविषयी

मुंबई : सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आणि भारतीय क्रिकेट यांचं नातं खूप जूनं आहे. सचिनने क्रिकेट मध्ये भारताला जगाच्या पटलावर नाव मिळून दिले. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेट या खेळालाही एक नवे स्थान मिळवून दिले. या क्रिकेटच्या देवाचा आज ४६ वा वाढदिवस. २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे.

सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये राजापूर च्या मराठी कुटुंबामध्ये झाला. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांचे खूप मोठे फॅन होते, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिन चे वडील रमेश तेंडुलकर मराठी शिक्षक होते. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८-८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी सचिन मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्व कालिन दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिवियन रिचर्ड्स यांच्यानंतरचा दुसरा सर्व कालिन सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती.

२०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.

पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्याला त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *