Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पहिला ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ संपन्न

‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान, ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!

‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे पहिल्या प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये शुक्रवारी आयोजन करण्यात आले. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अभिनेते संदीप कुलकर्णी, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लघुपट महोत्सवाच्या यशस्वितेबद्दल सहभागी दिग्दर्शकांचे आभार मानून ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशी ओळख असलेल्या अशोक राणे यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला आहे. त्यांच्यासह महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सहभागी झालेल्यांचे उद्योगमंत्री देसाई यांनी आभार मानले.

टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो, हा लघुपट महोत्सवदेखील सहभागी कलाकारांच्या जीवनात काहीतरी वेगळे घडवणार असल्याचे मत अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी मांडले.

या लघुपट महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात ‘खिसा’ ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला असून राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरले आहेत. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.  प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. प्रमुख अतिथींच्या हस्ते विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचादेखील विशेष गौरव करण्यात आला.

या महोत्सवाची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार
रु. ७५,०००/-चे रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार
रु. ५०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार
रु. २५,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट
(रु. २५,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट
१. अर्जुन / दिग्दर्शक : शिवराज वाईचळ
२. बटर चिकन / दिग्दर्शक : मयुरेश वेंगुर्लेकर
३. साईड मिरर / दिग्दर्शक : विराज झुंजारराव
४. लगाम / दिग्दर्शक : मदन काळे
५. ताजमहाल / दिग्दर्शक : प्रविण खाडे

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर – (बटर चिकन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *