Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईतील पिझ्झा हट(Pizza Hut) मध्ये खाद्य पदार्थात आढळला तब्बल २.५ इंचाचा धागा; वरळीतील अट्रीया मॉल येथील घटना

ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर ९ दिवस उलटूनही अद्याप कोणतेच उत्तर नाही

मुंबई, दि. १२: साधारणतः रस्त्यावरील अथवा पदपथांवर विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांत केस, मेलेले झुरळ, अळ्या आढळणे हि काही नवीन गोष्ट नाही. परंतू, स्वच्छतेबाबतचा विशेष टेंभा मिरवणाऱ्या कोणा महागड्या आंतरराष्ट्रीय खाद्य साखळीतील हॉटेल मध्ये जर असे काही आढळले तर नक्कीच तुमचा मोठा अपेक्षाभंग होईल. अशाच प्रकारच्या अपेक्षाभंगाचा सामना मुंबईतील लकूर परिवाराला करावा लागला आहे.

दिनांक चार एप्रिल २०२४ रोजी मुंबईतील वरळीस्थित राहणारे वैभव लकूर जवळच असलेल्या अट्रीया मॉल येथील पिझ्झा हट(Pizza Hut) येथे रात्री पावणे १० च्या सुमारास सहपरिवार आले होते. यावेळी त्यांनी वेज्जी सुप्रिम पिझ्झा, स्टफ्फड क्रस्ट मॅक्स, गार्लिक ब्रेड स्टिक्स अशा एकूण ३ पदार्थांची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने हे पदार्थ टेबलावर आल्यावर यातील गार्लिक ब्रेड स्टिक्स मध्ये लकूर यांच्या मुलीला अडीच ते तीन इंच लांबीचा दोरा आढळला. तात्काळ लकूर यांनी हि बाब पिझ्झा हट Pizza Hut च्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली असता त्याने फोटो अथवा व्हीडीओ काढण्यापूर्वी तो दोरा आत किचन मध्ये नेला. यानंतर लकूर यांनी तक्रार वहीची मागणी केली असता पिझ्झा हट Pizza Hut च्या व्यवस्थापनातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने त्यांना एक फॉर्म देत आपली तक्रार त्यात मांडण्यास सांगितली. तसेच तुमच्या तक्रारीची योग्य दखल घेत आम्ही तुम्हाला दोन दिवसात प्रतिसाद देऊ असे आश्वासनही त्याने तिले. एका सजग नागरिकाच्या भूमिकेतून वैभव लकूर यांनी व्यवस्थापनास त्याचवेळी लेखी तक्रार दिली. सोबत त्यांनी या हॉटेलमध्ये फार मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. अद्याप त्यांच्या तक्रारीची दखल घेत कोणतीही कारवाई झाल्याचे लकूर निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी फेसबुक पोस्ट करत सोशल मिडियाच्या माध्यमातून या किळसवाण्या व गंभीर प्रकाराला वाचा फोडली. हा धागा जर त्यांच्या मुलीने चुकून गिळला असता तर अन्ननलिकेत अथवा आतड्यांत तो अडकून तिला गंभीर शारीरिक इजा होण्याची शक्यता होती. परंतू, हि बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. सदर पिझ्झा हट PizzaHut हॉटेल मधील सीसीटीव्ही व्हिडीयो मध्ये ४ एप्रिल चा सर्व घटनाक्रम रेकॉर्ड झाला असल्याची माहिती लकूर यांनी दिली.

या प्रकारचे अनुभव याधीही लोकांना अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉटेल्स, फास्टफूड चैन उपहारगृहांत अनुभवाला आलेले असून अन्न व औषध प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत नाही. पिझ्झा हट PizzaHut सारखी नामांकित आंतरराष्ट्रीय खाद्य साखळीतील हॉटेल्स भारतात पदार्थ बनवताना खरंच दर्जेदार कच्चा माल खरेदी करतात का याबाबतही सदर घटनेनंतर शंका उपस्थित करण्यास वाव आहे. वैभव लकूर यांचे म्हणणे इतकेच आहे कि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व मुंबई महानगरपालिकेकडून वरळीतील पिझ्झा हट वर उचित कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात अशा मनस्तापाचा सामना आणखी कोणाला करावा लागणार नाही.

पदार्थ विकत घेतल्याची पावती व तक्रार अर्ज:

No photo description available.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *