भाजपच्या “ऑपरेशन लोटस”ला शिवसैनिकांच “ऑपरेशन पोकळ बांबू” ने उत्तर
मुंबई: राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. हा बहुमताचा आकडा सध्यातरी भाजपजवळ नाही. पण हा आकडा गाठण्यासाठी भाजपने आता “ऑपरेशन लोटस” सुरू केल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फार भडकल्याचे पहायला मिळत आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्स वर ऍक्टिव्ह असलेले या पक्षांचे कार्यकर्ते आपला राग निरनिराळ्या शब्दांत व्यक्त होत आहेत. त्यातल्या त्यात शिवसेनेचे सैनिक त्यांच्या रुतब्याप्रमाणे जरा जास्तच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशीच एक गमतीशीर व्हायरल पोस्ट पाहायला मिळली. ज्यात अंकुश गुरव हे शिवसैनिक म्हणतात की, “(ऑपरेशन लोटस) चालू झाले आहे तर शिवसेनेने ऑपरेशन पोकळ बांबू चालू करायला काही हरकत नाही. हीच ती वेळ यांना ठोकून काढायची.” राजकीय वादविवादात शिव्यांची लाखोलीही वाहिलेली पाहायला मिळते पण कोणताही अपशब्द न वापरता केलेल्या या पोस्ट एकेक कार्यकर्त्याच्या कल्पक बुद्धीचे प्रदर्शन करतात इतकं नक्की.

