Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट

देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट

मुंबई: जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून आज नुकतेच भाजपशी संधान साधलेले काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली. अजित पवार आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना सिंचन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाला. यानंतर सक्तवसुली संचालनालय, लाचलुचपत विभाग यांच्याकडून या घोटाळ्याचा तपास सुरू होता. पण दोन दिवसांपूर्वी भाजपच्या गोटात सामील झाल्या झाल्या आज दिनांक २५ रोजी लाचलुचपत विभागाकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. मुळात या घोटाळ्यात अजित पवारांवर सर्वात जास्त आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते पण आता तेच एकमेकांच्या मांडीला मांडी लावून एकत्र बसलेले दिसत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *